• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home धुळे

परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर

policevrutta by policevrutta
April 16, 2026
in धुळे
0
परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे : पोलीस वृत्त ऑनलाईन: धुळे जिल्हा वकील संघाच्या २०२६-२८ या कार्यकाळासाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, संपूर्ण वकील वर्तुळात निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात असून, अँड. राहुल भामरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलकडे विजयाची चिन्हे दिसू लागली आहेत.

अँड. राहुल भामरे यांच्या परिवर्तन पॅनलने नियोजनबद्ध आणि संघटित पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली असून, अल्पावधीतच त्यांनी वकिलांपर्यंत आपली भूमिका प्रभावीपणे पोहोचवली आहे. न्यायालय परिसरात, विविध बैठका, वैयक्तिक संपर्क मोहिमा तसेच चर्चासत्रांच्या माध्यमातून पॅनल आपले विचार मांडत आहे. या प्रचाराला वकिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

परिवर्तन पॅनलकडून वकिलांच्या हितासाठी ठोस आणि वास्तववादी आराखडा मांडण्यात आला आहे. न्यायालयीन सुविधा वाढवणे, पायाभूत सोयीसुविधांचा विकास, वकिलांसाठी कल्याणकारी योजना राबवणे, तरुण व नवोदित वकिलांना संधी उपलब्ध करून देणे तसेच संघाच्या कारभारात पारदर्शकता व उत्तरदायित्व आणणे या प्रमुख मुद्द्यांवर पॅनल भर देत आहे. याशिवाय, वकिलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका पॅनलने अधोरेखित केली आहे.

अँड. राहुल भामरे यांच्या नेतृत्वशैलीबाबतही वकिलांमध्ये सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. प्रामाणिकपणा, स्पष्ट भूमिका आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढत आहे. परिणामी, परिवर्तन पॅनलकडे झुकत असलेला कल स्पष्ट जाणवत असून, वकील संघात बदलाची चाहूल लागल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा वकील संघात परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी काळात ही निवडणूक केवळ पदाधिकारी निवडण्यापुरती मर्यादित न राहता, संघाच्या भविष्यातील दिशादर्शन करणारी ठरणार आहे, असे मत वकील वर्तुळात व्यक्त होत आहे. दरम्यान, सदर निवडणुकीसाठी मतदान दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धुळे जिल्हा न्यायालय येथे पार पडणार आहे. तर मतमोजणी २५ एप्रिल २०२६ रोजी होणार असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Previous Post

शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड

Next Post

‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात

policevrutta

policevrutta

Next Post
‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात

‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!