अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन तालुक्यातील शिरूड येथील विकास सहकारी सोसायटीने यंदाही सलग ३०व्या वर्षी ३१ मार्च रोजी १०० टक्के कर्जफेड करून एक आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले एकूण २ कोटी ९५ लाख ३३ हजार रुपयांचे कर्ज वेळेत भरल्यामुळे जिल्हा बँकेचे संपूर्ण कर्ज फेडण्यात आले असून, सोसायटीच्या चालू खात्यात शिल्लक रक्कम जमा झाली आहे.
शिरूड गावातील ही परंपरा गेली तीन दशके अखंड सुरू असून, यामागे गावातील शेतकरी, पदाधिकारी व संचालक मंडळाचे संयुक्त प्रयत्न कारणीभूत असल्याचे मानले जाते. सोसायटीची गावात प्रशस्त व भव्य सागवान लाकडाची इमारत असून, त्याच ठिकाणी जिल्हा बँकेची शाखाही कार्यरत आहे. तसेच सोसायटीमार्फत स्वस्त धान्य दुकान व दुकान संकुलही चालविले जाते.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातही १०० टक्के कर्जफेड साध्य करण्यासाठी चेअरमन अरुण दादा पाटील, व्हाईस चेअरमन सविता ताई, संचालक प्रा. सुभाष पाटील, बापूराव महाजन, गोरख धनगर, धोंडू मास्तर, अनंतराव मोरे, सुभाष महाजन, सीताराम पाटील, भास्कर पाटील, वासुदेव पाटील, तिलोत्तमा ताई, शाम बापू, मीराताई पाटील तसेच सेक्रेटरी रविंद्र आप्पा, सेल्समन वीरभान जीभू, बापू मोरे यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक शेषराव साहेब, सोनवणे साहेब, आहिराव साहेब, भाऊसाहेब पाटील, प्रफुल पाटील, सुपडू पाटील, वसंत पाटील, नंदू पाटील आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शिरूड विकास सहकारी सोसायटीची ही कर्जफेडीची परंपरा इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, आर्थिक शिस्त व एकजुटीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून तिचा उल्लेख केला जात आहे

