• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात

policevrutta by policevrutta
April 16, 2026
in Uncategorized
0
‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
0
SHARES
438
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे गृहोपयोगी संच वाटप करताना ‘केवायसी’ करण्याच्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Case) मुद्देमालासह पकडले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जळगाव शहरातील एका तक्रारदाराने ९ एप्रिल रोजी योजनेंतर्गत गृहोपयोगी संच मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर बुधवारी (ता. १५) त्यांना चिंचोली (ता. जळगाव) येथे संच घेण्यासाठी बोलावण्यात आले होते.
तक्रारदार तेथे उपस्थित राहिल्यानंतर, संच देण्यापूर्वी ‘केवायसी’ करावी लागेल आणि त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी महिला लोकसेवक आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांनी केली.
याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी आसमा शेख यांनी पंचांसमक्ष १०० रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
टेबलखाली सापडली अन्य रोकड
कारवाईदरम्यान संशयित महिला कर्मचारी बसलेल्या टेबलाखालील पत्रपेटीत ४१ हजार २५० रुपयांची रोकड आढळून आली. त्यामुळे इतर लाभार्थ्यांकडूनही रक्कम गोळा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ७५८८६६१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर

Next Post

धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार

policevrutta

policevrutta

Next Post
धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार

धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार
  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!