• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

जळगाव-नाशिकमधील ३६ शेतमजुरांना डांबून ठेवले; मुकादम अडचणीत

policevrutta by policevrutta
July 17, 2026
in अमळनेर, जळगाव, नाशिक
0
जळगाव-नाशिकमधील ३६ शेतमजुरांना डांबून ठेवले; मुकादम अडचणीत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव व नाशिक जिल्ह्यातील आठ कुटुंबातील 36 शेतमजुरांना दोन वर्ष बंधनात ठेवून, मारहाण करून धमकावून त्यांच्या इच्छेविरुद्ध कमी पगारात ऊस तोड व इतर काम करून घेतल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वळती तालुका आंबेगाव येथील मुकादम खंडू भानुदास माने (वय 36) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.आरोपी फरार झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

याबाबत शेतमजूर सुरेश रवींद्र सोनवणे ( वय 30, सध्या राहणार सुलतानपूर,फाईन मळा,ता. जुन्नर, मूळ राहणार भिलाटी आनंदनगर , ता.एरंडोल ,जि.जळगाव) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जळगाव व नाशिक जिल्ह्यातील आठ कुटुंबातील 36 सदस्य आरोपी खंडू माने याच्याकडे मे 2024 पासून ऊस तोडणी व इतर कामासाठी आले होते. सुलतानपूर येथे झोपड्या बांधून या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.आरोपी माने याने फिर्यादी सह सुरेंद्र रवींद्र सोनवणे, दुर्गा सुरेश सोनवणे, जितू सुरेश सोनवणे, दादू संजू सोनवणे, संगीता दादू सोनवणे, राणी दादू सोनवणे,चांदनी दादू सोनवणे, दिव्या दादू सोनवणे, विनोद भगवान गायकवाड, सखू विनोद गायकवाड, सारिका विनोद गायकवाड, राधिका विनोद गायकवाड, नेहा विनोद गायकवाड, शंकर शामराव मोरे, उमा शंकर मोरे,सावन शंकर मोरे, अक्षरा शंकर मोरे, भगवान रामदास गायकवाड, रवी रामदास सोनवणे, लक्ष्मी नामदेव सोनवणे, राजेंद्र रामदास सोनवणे, सुरेखा राजेंद्र सोनवणे, कृष्णा राजेंद्र सोनवणे, रोशनी राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर देवचंद सोनवणे, दिव्या ज्ञानेश्वर सोनवणे, संगीता ज्ञानेश्वर सोनवणे, शिवा ज्ञानेश्वर सोनवणे, गंगाबाई ज्ञानेश्वर सोनवणे, उषा नामदेव सोनवणे, खुशी नामदेव सोनवणे, साई नामदेव सोनवणे, अनिल शिवाजी बर्डे, शिव अनिल बर्डे, कविता अनिल बर्डे, मोहन नामदेव सोनवणे या शेतमजुरांची आधार कार्ड, मोबाईल स्वतःच्या ताब्यात ठेवले.मागील दोन वर्ष त्यांच्याकडून 12 ते 18 तास काम करून घेतले. मात्र ठरलेला पगार दिला नाही. हिशोब मागितल्यानंतर मारहाण, शिवीगाळ करून धमकावले.इच्छा नसताना देखील सुरेश सोनवणे यांच्यासह आठ कुटुंबातील 36 शेतमजुरांकडून सक्तीने काम करून घेतले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.आय.पाटील करत आहेत.

Previous Post

अमळनेरमध्ये हृदयद्रावक घटना; पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तिघांचा मृत्यू

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • जळगाव-नाशिकमधील ३६ शेतमजुरांना डांबून ठेवले; मुकादम अडचणीत
  • अमळनेरमध्ये हृदयद्रावक घटना; पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तिघांचा मृत्यू
  • नवापूर:  महामार्गावर पोलिसांचा सापळा; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
  • नव्या आयुष्याच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच काळाने गाठलं; संपूर्ण कुटुंब संपलं
  • मैत्री वाढवून तरुणीला जाळ्यात ओढले; कारमध्ये अत्याचार; धरणगावच्या इसमाविरुद्ध गुन्हा
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!