अमळनेर : येथील माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांचे व्हाट्सअप अकाउंट हॅक झाले आहे. विविध जणांना पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

सदर हॅक झालेल्या व्हाट्सएप अकाउंटवरून विविध व्यक्तींना पैशांची मागणी करणारे संदेश पाठविले जात आहेत. ही बाब आमदारांना कळवताच त्यांनी गणेश भामरे व त्यांचे सुपुत्र याना कळवून सायबर क्राईम व इतर ठिकाणी तक्रारी करायला सांगितल्या असून तशी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी कोणत्याही परिस्थितीत अशा संदेशांना बळी पडू नये. कोणतेही पैसे पाठवू नयेत, कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये ओ टी पी बँकिंग किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, त्या क्रमांकावर प्रत्युत्तर देऊ नये.ही फसवणुकीची बाब असून सर्वांनी सतर्क राहावे व हा संदेश आपल्या परिचितांपर्यंत पोहोचवून जनजागृती करावी. असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे अफवांवर विश्वस न ठेवता असा संदेश किंवा काही मागणी झाल्यास तात्काळ संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.