• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home खान्देश

स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली

policevrutta by policevrutta
September 12, 2026
in खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव:गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात बऱ्हाणपूर येथून आणलेली १२ फूट उंचीची गणेशमूर्ती जळगावच्या वाटेवरच दुभंगल्याने नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्थापनेपूर्वीच मूर्तीचे विसर्जन करण्याची वेळ आली.
सुमारे ४७ हजार रुपये खर्च करून तयार करून घेतलेल्या या मूर्तीची अवस्था पाहून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धक्का बसला. मूर्ती पूर्णपणे वाळण्यापूर्वीच ती घाईघाईने ताब्यात देण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप मंडळाने केला आहे.

जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी बऱ्हाणपूर येथील मूर्तिकाराकडून १२ फूट उंचीची गणेशमूर्ती तयार करून घेतली होती. यासाठी मंडळाने सुमारे ४७ हजार रुपये दिले होते. मूर्ती जळगावकडे आणताना ती झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीदरम्यान मूर्तीला तडा गेल्याचे किंवा ती दुभंगल्याचे तत्काळ लक्षात आले नाही.

गुरुवारी सायंकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीवरील आवरण काढले. त्यावेळी मूर्ती दुभंगल्याचे निदर्शनास आले. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थापनेसाठी तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी मूर्तीची अशी अवस्था झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि हळहळ व्यक्त झाली.

मेहरुण तलावात विसर्जन

दुभंगलेली मूर्ती मंडळाच्या मंडपात स्थापन करणे शक्य नसल्याने तिचे विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत दुभंगलेल्या गणेशमूर्तीचे मेहरुण तलावात विसर्जन करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून मूर्तिकाराची निष्काळजी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मंडळाने केली आहे.

मूर्तिकारावर निष्काळजीचा आरोप

मंडळाचे पदाधिकारी भूषण जोशी यांनी सांगितले, की मूर्तिकाराने पूर्ण पैसे घेतल्यानंतरही मूर्ती व्यवस्थित तयार करून दिली नाही. ओली मूर्ती घाईघाईने जळगावला पाठविल्याने वाहतुकीदरम्यान ती दुभंगली. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Previous Post

सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!