• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

भावजयीच्या खुनातील दिराला जन्मठेप; सासूला तीन वर्षांची सक्तमजुरी

policevrutta by policevrutta
August 19, 2026
in Uncategorized, क्राईम, खान्देश, चाळीसगांव, जळगाव
0
भावजयीच्या खुनातील दिराला जन्मठेप; सासूला तीन वर्षांची सक्तमजुरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : भावजयीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिने विरोध केल्याने तिचा गळा आवळून खून करणाऱ्या दिराला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रवीण छगन बैरागी (२६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची आई तथा मयत महिलेची सासू लीलाबाई बैरागी हिला तीन वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी हा निकाल दिला.
मयत महिलेचा पती सीआयएसएफमध्ये नोकरीला असल्याने ती आपल्या मुलीसह सासू व दिरासोबत गावी राहत होती. ३ जुलै २०१८ रोजी रात्री महिला मुलीसह झोपलेली असताना प्रवीणने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्याने प्रवीणने तिचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान मयत महिलेची मुलगी, तपासाधिकारी दिलीप शिरसाठ, जयपाल हिरे आणि हेमंत शिंदे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षी व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले.
प्रवीण बैरागीला खून प्रकरणी जन्मठेप व २० हजार रुपये दंड, बलात्काराच्या प्रयत्नासाठी पाच वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास संबंधित शिक्षाही भोगावी लागणार आहे. तर लीलाबाई बैरागी हिला पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Previous Post

आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • भावजयीच्या खुनातील दिराला जन्मठेप; सासूला तीन वर्षांची सक्तमजुरी
  • आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात
  • ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा; ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर गुन्हा
  • राज्यस्तरीय ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने मनोजकुमार वानखेडे यांचा गौरव
  • आम्हाला वाचवा…’ तो कॉल कट झाला अन् गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली! आई-दोन मुलींचा दुर्दैवी अंत
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!