• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

policevrutta by policevrutta
August 18, 2026
in क्राईम, जळगाव
0
आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगावमधून पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.योगेश रामभाऊ पाटील (रा. आदर्शनगर, जुन्या आरटीओजवळ, जळगाव) असे संशयित लाचखोराचे नाव असून या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली.

काय आहे प्रकरण?
तक्रारदार एक खासगी वकील असून ते दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी गत १ जुलै २०२६ रोजी खान्देश मोटर्स शोरूमधून मारुती कंपनीची ‘अल्टो के-१० व्हीएक्सआय’ कार खरेदी केली होती. ३ ऑगस्ट रोजी संशयित एजंट योगेश पाटील याच्यामार्फत या कारची तात्पुरती नोंदणी करण्यात आली.

कारमध्ये हॅण्डकिट बसविल्यानंतर, कायमस्वरूपी पासिंगबाबत १२ ऑगस्ट रोजी तक्रारदारांनी आरटीओ कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी एजंट योगेश पाटील याने आरटीओ अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नावाने सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी केली. नंतर तडजोड होऊन हा आकडा ८,५०० रुपयांवर ठरला.

या प्रकारामुळे तक्रारदारांनी १७ ऑगस्ट रोजी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली असता, योगेश पाटील याने ८,५०० रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये घेण्याचे मान्य केले.त्यानुसार, १७ ऑगस्ट रोजीच इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूम परिसरात एसीबीने सापळा रचला. योगेश पाटील याने पंचांसमक्ष ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण घोटाळ्यात इतर आरटीओ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे, या दिशेनेही एसीबीकडून अधिक तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा; ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर गुन्हा

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात
  • ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा; ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर गुन्हा
  • राज्यस्तरीय ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने मनोजकुमार वानखेडे यांचा गौरव
  • आम्हाला वाचवा…’ तो कॉल कट झाला अन् गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली! आई-दोन मुलींचा दुर्दैवी अंत
  • शिरूडला मुसळधार पावसाचा तडाखा; घरे, अंगणवाडी, गोठे जलमय, शेती पाण्याखाली
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!