अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन – मुलीच्या जेईई ऑनलाईन बाय ज्यू क्लास साठी आणि नोट साठी महिलेकडून सुमारे पावणे तेवीस लाख रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार २९ ऑक्टोबर २०२४ ते २ जून २०२६ दरम्यान घडला असून सायबर क्राईम ला पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती विनोद सोनार रा राजाराम नगर अमळनेर या महिलेची मुलगी सेंट मेरी शाळेत होती तेथून बाय ज्यू क्लास साठी मोबाईल नम्बर व सर्व माहिती घेऊन सचिन राठोड यांनी महिलेला संपर्क करून ऑनलाईन मिटिंग घेतली. मुलीला जे ई ई क्लास साठी १ लाख ९ हजार ५०० रुपये लिंक पाठवून मागून घेतले. एकूण अडीच लाख रुपये फी सांगितली आणि मेस आणि हॉस्टेल फी वेगळी सांगितली होती. नंतर शरद पवार यांनी उर्वरित पैसे हप्त्याने देण्यास सांगितले. त्यांनी दुसऱ्याचा आय डी देऊन मुलीला क्लास जाईन करायला सांगितले. मात्र काहीच तास व्हायचे. नोट्स देखील मिळाल्या नाहीत म्हणून महिलेला शंका यायला लागली. अधिक चौकशी केली तेव्हा दुसराच आय डी देऊन फसवले असे लक्षात आले. महिलेला लगेच गणेश कुमार मीना यांच्या मोबाईल वरून आम्ही अधिकारी आहोत तुमचे पैसे काढून देतो म्हणून संपर्क केला. त्याने त्याच्या वर्दी वरील आय डी आणि काही बैठकीचे फोटो पाठवून त्याच्या सोबत अनुज कुमारर आणि प्रदीप कुमार मीना या सर्वांनी वेग वेगळ्या मोबाईल वरून खाते बदल ,अपडेट अशा वेगवेगळ्या कारणाने सुमारे २१ लाख ६५ हजार ६३७ रुपये फोन पे ने मग ऊन घेतले. असे एकूण २२ लाख ७५ हजार १३७ रुपयात फसवणूक केली. महिलेने जळगाव येथे सायबर क्राईम ला भारतीय न्याय संहिता ३१८(४) ,३(५) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) प्रमाणे पाचही जण आणि आकाश बायजु लिंक चालवणारे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरक्षक सतीश गोराडे करीत आहेत.




