अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – अयोध्या येथे २२ जानेवारी प्रभू श्री रामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जगाचे लक्ष लागलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून देशाच्या कानाकोपऱ्यात त्याकरिता अक्षता पोहोचवण्यासाठी – अयोध्या येथून अक्षता कलश पाठवण्यात आले आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून शिरूड गावात (दि.१९.) सायंकाळी सार्वजनिक मित्र मंडळ यांच्यातर्फे घरोघरी अक्षतांचे वाटप करण्यात आले.
प्रथम मारुती मंदिरात उपस्थित कार्यकत्यांच्या हस्ते प्रभू रामाची व हनुमानाची आरती करण्यात आली. शिवाय अक्षतांचीही पूजा करण्यात आली. नंतर या पवित्र अक्षतांचे गावात वाटप करण्यात आले. अक्षता वाटप करतांना असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. अक्षतांचे वाटप करताना श्रीराम नामाचा जयघोष करण्यात आला.






