• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

संक्रांत ठरली अखेरची, विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू; अन्य तीन भाजल्याने जखमी…

policevrutta by policevrutta
January 16, 2024
in क्राईम, चोपडा, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संक्रांत ठरली अखेरची, विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू; अन्य तीन भाजल्याने जखमी…
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोपडा प्रतिनिधी पोलीस वृत्त ऑनलाईन: तालुक्यातील वेळोदे शेत शिवारात शेतात ईलेक्ट्रीक तारांचे काम करीत असतांना शॉक लागून कंत्राटी वायरमन संदीप प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाल्याने मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब कुटुंबियांवर संक्रांत आल्याने गावभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर अन्य तीन जण भाजून जखमी झाले आहेत. याप्रकरणी मयताचे भावाच्या फिर्यादीवरून शेत मालक, ईलेक्ट्रीकल कंत्राटदार तथा सुपरवायझर,एम एस इ बी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.विना परवाना सावळा कारभार एकाच्या जीवावर बेतल्याने संबंधित सब स्टेशनचा प्रकार चव्हाट्यावर आल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार,आज, दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सोपान बाबुराव पाटील राहणार मोहिदा यांच्या शेतातील शेती पंपासाठीची इलेक्ट्रिक लाईनचे तार ओढण्याचे कामा करीता इलेक्ट्रिक कंत्राटदार व सुपरवायझर दिनेश चौधरी यांनी तसेच शेतकरी सोपान बाबुराव पाटील व एम एस सी बी चे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारचे विद्युत सुरक्षा विषयक साहित्य न पुरविता वरून गेलेली मुख्य वीज वाहीनीतील वीजप्रवाह बंद करता समाधान रामकृष्ण पाटील अनवर्दे बुद्रुक, दिनेश विकास पाटील गणपुर, ज्ञानेश्वर भगवान पाटील अनवर्दे बुद्रुक व संदीप प्रकाश सोनवणे वेळोदे यांना कामास लावले. त्यांच्या या सदरच्या निष्काळजीपणामुळे संदीप प्रकाश सोनवणे हे इलेक्ट्रिक शॉक लागून मयत झाले तर दिनेश विकास पाटील समाधान रामकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात वासुदेव प्रकाश सोनवणे वय 27 धंदा रिक्षा चालक राहणार वेळोदे राहणार विरोधी यांच्या फिर्यादीवरून सीआरपीसी ०८/ २०२४ भांदवि कलम ३०४, ३३७ ,३३६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितनवरे हे करीत आहेत
*संदीपचे जीवन लहानपणीच हलाखीचे*
संदीप हा लहान असतांना आई-वडिलांचे छत्र हरवले आहे .दोन भावंडांना आजी आजोबांनी सहारा देऊन वाढविले आहे.वडील हे मुलांना सोडून तमाशा निघून गेलेले आहेत अत्यंत गरीब परिस्थितीतून जेमतेम पोटाची खळगी भरत असतांना काळाने आईला ही हिरावून नेले होते. “संदीप”ला परिसरात कोणीही फोन केला तरी अर्ध्या रात्री काम करणारा व्यक्ती अशी त्याची ओळख होती.त्याच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Previous Post

तर या व्यक्तींसाठी अती घाई त्रासदायक ठरू शकते, तर यांच्या साठी आजचा दिवस शुभ असणार

Next Post

Jalgaon News : रस्त्यावरुन वाद, डोक्यात घातली कुऱ्हाड एकाचा खून

policevrutta

policevrutta

Next Post
Jalgaon News : रस्त्यावरुन वाद, डोक्यात घातली कुऱ्हाड एकाचा खून

Jalgaon News : रस्त्यावरुन वाद, डोक्यात घातली कुऱ्हाड एकाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!