जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन – यावल तालुक्यातील पिळोदे येथे १४ जानेवारीच्या मध्यरात्री मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर काही तासांनी पुन्हा म्हणजेच रिधुरी येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा एकाचा खून करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून एकाचा खून झाला आहे. सोमवारी रात्री ८.३० वाजता घराच्या वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन धनराज वासुदेव सोनवणे (वय ५०) यांच्या डोक्यात कुर्हाडीने वार करण्यात आले.

यात धनराज सोनवणे (Dhanraj sonawane) जागीच ठार झाले. तर याच हाणामारीत सतीश सुखदेव सोनवणे(sukdev sonawane)(वय ३०), आरती सतीश सोनवणे(arati sonawane) (वय २८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज सोनवणे हे आपल्या घराच्या वापराच्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी सतीश सोनवणे व त्याचे कुटुंबीय रस्त्यावर थांबले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात सतीश सोनवणेने धनराज सोनवणे यांच्या डोक्यात कुर्हाडीने वार केले. यामुळे धनराज सोनवणे जागीच ठार झाले.पोलिसांनी याप्रकरणी सोनी धनराज सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सतीश सोनवणे, युवराज सोनवणे व दीपक सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे करत आहेत.

