• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह

policevrutta by policevrutta
January 27, 2026
in अमळनेर, क्राईम, जळगाव ग्रामीण, भुसावळ
0
धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
0
SHARES
470
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ । पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव जिल्ह्यातील साकरी (ता. भुसावळ) येथे शिकवणीसाठी निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह गावालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर दोन्ही मुली इयत्ता नववीत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भुसावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली साकरी गावातील रहिवासी असून त्या नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत त्या पडल्या असाव्यात असा संशय बळावला. विहिरीची पाहणी केली असता दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्यातील पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू अपघातामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

एका संशयिताला ताब्यात
या प्रकरणाबाबत माहिती देताना जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, आज सकाळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार भुसावळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दोन्ही मुलींचे वय अंदाजे पंधरा वर्षे आहे. तक्रार मिळताच पोलीसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान साकरी गावाजवळील एका विहिरीत दोन मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून ही घटना नेमकी कशी घडली याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी एका संशयित मुलाला ताब्यात घेण्यात आले असून तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेडिंग

Previous Post

फेसबुकवर बदनामी, थेट खंडणीची मागणी; अमळनेरमध्ये २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी अनंत निकम अटकेत

Next Post

”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव

policevrutta

policevrutta

Next Post
”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव

''हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं'', प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • फेसबुकवर बदनामी, थेट खंडणीची मागणी; अमळनेरमध्ये २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी अनंत निकम अटकेत
  • धक्कादायक: देवळीतील आयटीआय मागे प्रेमी युगुलाची आत्महत्या;
  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!