• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home एरंडोल

बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड

policevrutta by policevrutta
February 6, 2026
in एरंडोल, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन एरंडोल तालुक्यातील तीर्थक्षेत्र पद्मालयाजवळील जंगलात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. एका ‘बिअरच्या बाटली’मुळे मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
पोलीस भरतीचे स्वप्न पाहणारा एक तरुणानेच ही हत्या केल्याचे उघडकीस आले असून मृत व्यक्ती ही तृतीयपंथी होता.

काय आहे प्रकरण?

4 फेब्रुवारी रोजी पद्मालय परिसरातील जंगलात बकऱ्या चारणाऱ्या मुलांना एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे ओळख पटू नये अशा स्थितीत जाळण्यात आला होता. मात्र, घटनास्थळी पोलिसांना बिअरची एक रिकामी बाटली मिळून आली. हीच बाटली तपासाचा केंद्रबिंदू ठरली.

आरोपी कोण?

आकांक्षा गेंद्रे उर्फ अजय (वय 26, रा. छत्तीसगड) असे मयत तृतीयपंथीयाचे नाव असून जामनेर तालुक्यातील पहूर येथे राहणारा संदीप पाटील (वय 21) हा आरोपी आहे. 31 जानेवारी रोजी त्याने पद्मालय वनक्षेत्रात आकांक्षाची हत्या केली होती.

‘त्या’ सिरीयल नंबरने केला गेम!

शवविच्छेदनानंतर हा खून ३१ जानेवारीला झाल्याचे स्पष्ट झाले. डोक्यात बिअरची बाटली मारून आणि गळा आवळून हत्या केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळला होता. घटनास्थळी सापडलेल्या बिअरच्या बाटलीवरील ‘सिरीज नंबर’ वरून पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप आणि बिअर बार पिंजून काढले. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाद्वारे एका दुकानात युपीआय (UPI) पेमेंट झाल्याचे समोर आले. याच धाग्यावरून पोलिसांनी संदीप पाटील याला ताब्यात घेतले.

वर्दी मिळवण्याआधीच कोठडीची हवा

आरोपी संदीप पाटील हा बारावी पास असून नाशिक येथे एका केंद्रात पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. तिथेच त्याची ओळख छत्तीसगडमधील आकांक्षा गेंद्रे या तृतीयपंथीयाशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही दिवसांनी वाद सुरू झाले. आकांक्षाने संदीपच्या प्रशिक्षण केंद्रात आणि त्याच्या गावी जाऊन ‘तमाशा’ केला होता. या बदनामीचा बदला घेण्यासाठी संदीपने तिला पद्मालय येथे फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथे तिचा काटा काढला.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम, डीवायएसपी विनायक कोते (अमळनेर) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पीएसआय शरद बागल, सोपान गोऱ्हे, ईश्वर पाटील व त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. खाकी वर्दी अंगावर चढवून गुन्हेगारांना पकडण्याचे स्वप्न पाहणारा संदीप, आज स्वतःच एका बिअरच्या बाटलीमुळे खुनाच्या गुन्ह्यात गजाआड झाला.

Previous Post

जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!