• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

अमळनेरात घरफोडी; तिसऱ्या मजल्यावरील घरातून पावणे नऊ लाखांचे सोने लंपास

policevrutta by policevrutta
June 22, 2026
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेरात घरफोडी; तिसऱ्या मजल्यावरील घरातून पावणे नऊ लाखांचे सोने लंपास
0
SHARES
481
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


अमळनेर : पोलीस वृत्त – घरमालक साखरपुड्याला गेल्याचा गैरफायदा घेत तिसऱ्या मजल्यावरच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी घरातील कपाट तोडून सुमारे ८ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २१ रोजी सकाळी उघडकीस आली.
छगन चुडामन बिऱ्हाडे रा एकता नगर जिनगर गल्ली  यांनी फिर्याद दिली की , पुतण्याचा साखरपुडा असल्याने ते घराला कुलूप लावून २० रोजी रात्री साडे दहा वाजता सुरत येथे गेले होते. २१ रोजी सकाळी आठ वाजता मंगलाबाई रातीलाल बिऱ्हाडे यांनी फोन करून सांगितले की तुमच्या दुसऱ्या मजल्यावरचे आणि तिसऱ्या मजल्यावरचे घराचे कुलूप तुटलेले दिसत आहे. दरवाजे उघडे आहेत. घरात चोरी झाल्याचे समजताच छगन बिऱ्हाडे दुपारी अडीच पर्यंत अमळनेर येथे पोहचले. खालच्या मजल्यावर कुलूप जसेच्या तसे होते. ते उघडून आत प्रवेश केला असता दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ठेवलेले कापटाचे लॉक तोडलेले दिसून आले आणि त्यातील दागिने लंपास झालेले दिसले.
घरातील ४८०० रुपयांची अर्धा ग्राम वजनाची लहान बाळाची सोन्याची रिंग , ३ लाख ६० हजार ७८८ रुपयांची २५.१८ ग्राम वजनाची सोन्याची पोत , ७३ हजार ९९७ रुपयांची ५.०७ ग्राम वजनाचे सोन्याची पोत पेंडल , १ लाख ३३ हजार २५२ रुपयांची ९.३४ ग्राम सोन्याची पोत , २१ हजार  ४५५ रुपयांचे १.४७ ग्राम वजनाच्या सोन्याच्या मंगळसूत्र  वाट्या, ४१ हजार ३०४ रुपयांचे २.८३ ग्राम वजनाच्या कानातल्या बाळ्या , २ लाख ३० हजार ४७२ रुपये किमतीच्या ३५ ग्राम वजनाचा चपला हार असा एकूण ८ लाख ६६ हजार ६८ रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
जिनगर गल्ली इतकी निमुळती आणि दाट वस्तीचे असल्याने चोरी होणे अशक्य होते. मात्र खालच्या मजल्यावर कुलूप जसेच्या तसे असल्याने चोरट्यानी शेजारच्या घरावरून इमारतीत प्रवेश केला असावा.
घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते  , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम  , पोलीस उपनिरीक्षक काकळीज ,  पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर  , निलेश मोरे  , शेखर साळुंखे , विनोद संदानशिव ,गणेश पाटील ,उज्वल पाटील , नितीन मनोरे यांनी भेट दिली. त्याच प्रमाणे जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक , श्वान पथक , ठसे तज्ञ यांनी भेटी दिल्या. कपाटावर चोरट्यांचे ठसे मिळून आले असून पोलिसांनी त्यांचे नमुने घेतले आहेत.
अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) , ३३१(४) प्रमाणे  गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

हेडिंग

Previous Post

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी

Next Post

उच्च शिक्षणातील बदलत्या प्रवाहामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल

policevrutta

policevrutta

Next Post
उच्च शिक्षणातील बदलत्या प्रवाहामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल

उच्च शिक्षणातील बदलत्या प्रवाहामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मंत्री गिरीश महाजनांचे मॉर्फ फोटो व्हायरल; दोषींवर कारवाईची मागणी
  • शविआ‌’च्या बैठकीला ‌‘खो‌’ देऊन मुख्याधिकारी बदलीसाठी मुंबईला?


    ‌‘शविआ‌’तर्फे निषेध; आता संयमित भूमिकेऐवजी घेणार आक्रमक पावित्रा
  • कळमसरे रस्त्यावर दामिनी पथकाचा धडक अॅक्शन; तीन प्रेमी युगुल ताब्यात
  • उच्च शिक्षणातील बदलत्या प्रवाहामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल
  • अमळनेरात घरफोडी; तिसऱ्या मजल्यावरील घरातून पावणे नऊ लाखांचे सोने लंपास
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!