• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अमळगावच्या सुपुत्राचे वैद्यकीय क्षेत्रात यश; डॉ. मनीष पवार यांचे एमबीबीएस शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण

policevrutta by policevrutta
June 21, 2026
in Uncategorized
0
अमळगावच्या सुपुत्राचे वैद्यकीय क्षेत्रात यश; डॉ. मनीष पवार यांचे एमबीबीएस शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन – तालुक्यातील अमळगाव येथील रहिवासी डॉ. मनीष महेश पवार यांनी रशियातील होस्टेस युनिव्हर्सिटी, रशिया येथून एमबीबीएस (मेडिसीन – जनरल फिजिशियन) पदवी विशेष प्राविण्य गुणांसह पूर्ण करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे अमळगावसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. मनीष पवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी रशियातील नामांकित विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस पदवी विशेष श्रेणीत संपादन केली.
डॉ. मनीष यांचे वडील महेश पवार हे नाशिक पोलीस दलात कार्यरत असून आई गृहिणी आहेत.

सामाजिक व लोकसेवेची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील ते सुपुत्र आहेत. ते माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास मोतीराम पवार यांचे नातू असून लोकसेवेचा वारसा पुढे नेत अमळनेर परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.

तसेच ते पीक संरक्षण सोसायटीचे व्हाइस चेअरमन दशरथ पवार यांचे पुतणे आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय त्यांनी व्यक्त केले असून त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

डॉ. मनीष पवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अमळगाव व परिसरातील नागरिक, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Previous Post

पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

Next Post

बालाजी आयुर्वेद (Regd.)
वजन कमी करा – पोटाची चरबी व ढेरी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

policevrutta

policevrutta

Next Post
बालाजी आयुर्वेद (Regd.)वजन कमी करा – पोटाची चरबी व ढेरी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

बालाजी आयुर्वेद (Regd.)
वजन कमी करा – पोटाची चरबी व ढेरी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी
  • बालाजी आयुर्वेद (Regd.)
    वजन कमी करा – पोटाची चरबी व ढेरी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
  • बालाजी आयुर्वेद (Regd.)
    वजन कमी करा – पोटाची चरबी व ढेरी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
  • अमळगावच्या सुपुत्राचे वैद्यकीय क्षेत्रात यश; डॉ. मनीष पवार यांचे एमबीबीएस शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण
  • पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!