• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक: तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल , घरात संपवलं जीवन

policevrutta by policevrutta
February 5, 2025
in क्राईम, ठाणे, धरणगाव, धुळे, नंदूरबार, पाचोरा, पुणे, ब्रेकिंग, राज्य
0
धक्कादायक: तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल , घरात संपवलं जीवन
0
SHARES
862
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे – पोलीस वृत्त न्युज: संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय-30) यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे. घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण समोर आलं आहे.शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता.वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

देहूतील त्यांच्या राहत्या घरी शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली आहे. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. आर्थिक विवंचनेतुन हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आलं आहे. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. ते प्रवचन आणि कीर्तन करायचे.

देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. आर्थिक विवंचनेतून हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच ही घटना घडली आहे.

शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधलेले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहतात. काल (मंगळवारी) रात्री मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. म्हणून घरातील लोकांनी वरती रूमजवळ जाऊन दरवाजा वाजवला पण दार उघडले नाही. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडलं. मात्र, मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतय. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिली. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरीष महाराज यांनी आपलं जीवन संपवण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.

Previous Post

मनसे शहरउपाध्यक्ष गजानन गोसावी व आदित्य दोरकर यांची नियुक्ती

Next Post

दुर्दैवी: महाकुंभसाठी जातांना काळाचा घाला; भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू

policevrutta

policevrutta

Next Post
दुर्दैवी: महाकुंभसाठी जातांना काळाचा घाला; भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू

दुर्दैवी: महाकुंभसाठी जातांना काळाचा घाला; भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!