चाळीसगाव : पोलीस वृत्त ऑनलाइन- रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातून एकदा समोर आली आहे चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील केटी वेअर धरण परिसरात खेळायला गेलेल्या चार सख्ख्या बहीण- भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . रविवारी १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घटना घडली
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आदिवासी समाजाचे आर्य परिवार मजुरीसाठी म्हणून येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे आलेले आहे. त्यांच्या परिवारात ५ मुली, १ मुलगा आहेत. परिवारातील मोठी मुलगी ही भांडी घासण्यासाठी के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली होती.बहिणी सोबत जावे म्हणून रोशनी सुभाषसिंग आर्य (वय ९ वर्ष), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय ८ वर्ष), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय ३ वर्ष) आराध्या सुभाषसिंग आर्य (वय ४ वर्ष, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) ही चार मुले रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास सोबत गेली.
धरणाच्या पाण्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी धावाधाव केली. काहींनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविले. पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पावरा परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे पावरा कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.