जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन भारत देशात तसेच मुख्यतः गुजरात व महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पतंग उडवून आनंद लुटतांना नागरिक दिसून येतात. संक्रांतीनिमित्त तिळगुळ देऊन, तिळगुळ घ्या… गोड गोड बोला… असा बोलण्याची परंपरा आपणास आढळून येते. मागच्या काही वर्षांपासून मोठ मोठे पतंग उत्सव आयोजित करण्यात येतात. पण या पतंग उत्सवात समाजातील ठराविक स्तरातील नागरिक सहभागी होत असल्याचे दिसून येतात.
याच प्रमाणे जळगाव शहरातील आर्थिकरित्या बिकट स्तरातील मुलांसाठी मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड करण्याच्या हेतूने युवाशक्ती फाऊंडेशन ग्रुप तर्फे सुमारे १३०० मुला – मुलींना पतंगीचे व पर्यावरणपूरक मांज्याचे वितरण करण्यात आले. पतंग स्वीकारतांना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
“जळगावकर नागरिकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून संक्रांत उत्सव साजरा करत असतांना आपल्या जवळच्या गरजूंना पतंग, तिळगुळ, मिठाई देऊन सर्वसमावेशक उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करावा…” असा नम्र आव्हान युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे या वेळी करण्यात आले.
या वेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, प्रीतम शिंदे, प्रशांत वाणी, राहुल चव्हाण, सौरभ कुलकर्णी, संदीप सूर्यवंशी, पियुष हसवाल, शुभम पुशचा, नवल गोपाळ, भटू अग्रवाल, सयाजी जाधव, संस्कृती नेवे, नितीन जाधव उपस्थित होते.


