अमळनेर: (पोलीस वृत्त- ऑनलाईन) जिल्ह्यात नावाजलेले काँग्रेसचे कट्टर समर्थक तसेच अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणून ओळखले जाणारे मा प्रा. सुभाष पाटील यांनी सामान्य जनते पासुन ते महिला, तरुण शालेय विद्यार्थी तसेच शेतकरी वर्गासाठी अतोनात मेहनत करत शेतकऱ्याच्या हितासाठी झटणारे शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देणारा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाशी लढणारे सुभाष पाटील यांनी ग्रामीण भागातून एका खेड्या गावातून शहराकडे पाऊल टाकत तालुक्यात शिरुड गावाची मान उंचावली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत यश प्राप्त केले या यशाबद्दल त्यांचे खूप खूप आभार एका खेड्यागावातून निघणारा आवाज हा जिल्हापर्यंत पोहोचवलेला आहे मदतीला राहिलेली काँग्रेसची साथ कायम काँग्रेस पक्षा सोबत एकनिष्ठ राहून त्यांनी इमानदारीने पक्ष बळकट केला. आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते कायम लढत राहिले आणि आज त्या शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे तालुक्यात शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत शिरूड परिसरात सुभाष पाटील यांचा वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यशाबद्दल शिरुड वाशीयांनी सुभाष पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. (संपादक: रजनीकांत पाटील)


