पोलीस वृत्त ऑनलाईन बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात पाऊस होत आहे. दरम्यान राज्यात २ मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कायम राहणार आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तर याच काळात विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


