जळगाव : तोंडापूर ता. जामनेर येथे शुक्रवारी वादळासह मुसळधार पाऊस झाला
वीज पडून १० शेळ्या ठार झाल्या. या घटनेत मेंढपाळाचा परिवार थोडक्यात बचावला आहे.
तोंडापूर(Tondapur) येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस झाला. तब्बल एक तास झालेल्याा पावसात नदी- नाले तुडूंब भरून वाहू लागले. गावाजवळच निंबाच्या झाडावर वीज पडून नाशिक(nashik) जिल्ह्यातील मेंढपाळाच्या मालकीच्या आठ बकऱ्या व दोन मेंढ्या ठार झाल्या. यात एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. तलाठी शिवाजी काळे(shivaji kale) यांनी तात्काळ पंचनामा केला.


