• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

Breking..! वाऱ्यामुळे उभा कंटेनर पलटी! २ जणांना दाबून मृत्यु..

policevrutta by policevrutta
April 27, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
Breking..! वाऱ्यामुळे उभा कंटेनर पलटी! २ जणांना दाबून मृत्यु..
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: अवकाळी आलेल्या जोराच्या वादळामुळे उभा कंटेनर पलटी झाल्याने आडोश्याला उभे असलेल्या दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील चिंचोली-धानवड गावामधील हॉस्पिटलच्या बांधकामाच्या ठिकाणी गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह.मु. पुणे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे.

चिंचाली गावाजवळ नवीन शासकीय हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकाचा कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून गेल्या जानेवारीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी काही बिहार राज्यातील मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळ सुरू झाले. आलेल्या मोठ्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतू वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड देखील उडाली. त्यामुळे शेडमधील मजूर हे पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला. दरम्यान, सुसाट वेगाने सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे कंटेनर देखील पलटी झाला. या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि इंजिनिअर चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह.मु. पुणे हे दोघे दाबले गेल्याचे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम (वय-२३) रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Previous Post

खून प्रकरण-कायदा पायदळी तुडवणे भोवले
अमळनेरात सुमारे 150 जणांवर गुन्हे दाखल

Next Post

वीज कोसळून दहा शेळया ठार;

policevrutta

policevrutta

Next Post
वीज कोसळून दहा शेळया ठार;

वीज कोसळून दहा शेळया ठार;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!