अमळनेर प्रतिनिधी- स्पीकरचा आवाज कमी करा असे सांगण्यासाठी गेलेल्या एका भिल्ल (आदिवासी)समाजाचा युवकाचा खून झाल्याची घटना अमळनेर शहरातील दाजीबा नगरात घडली होती.मयत अक्षय भिल याचे नातेवाईक व समाज बांधव यांच्याकडून या घटनेचा काल तीव्र रोष व्यक्त करीत,धुळे महामार्गावर सुमारे अडीच ते तीन तास ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे सर्व सामान्य जनतेला वेठीस धरणे,दंगल,शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे,अश्लील शिवीगाळ करणे,कायदा पायदळी तुडवणे,पोलिसांना कुचकामी समजणे.आंदोलन कर्त्यांचे असे विविध प्रकारचे कृत्ये सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले आहेत. शिवाय या आंदोलनाचे धगधगते व्हिडीओ चित्रीकरण देखील पोलीस यंत्रणेकडे असून,त्या अनुषंगाने आंदोलनात नेतृत्व करणाऱ्यांसह सुमारे दीडशे जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यामुळे रागाच्या भरात घेतलेली टोकाची भूमिका चांगलीच अंगाशी आली आहे.पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक राकेश परदेशी करीत आहेत.✍️


