शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य अशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द हवी. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात.
पण मात्र अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील ‘या गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेची स्थिती पाहिली तर शाळेमध्ये काही विद्यार्थी वर्गात अन् काही विद्यार्थी वर्गाबाहेर अन् मास्तरांच्या चावळीवर विरंगुळा वर्ग सुनाट वाऱ्यावर शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ‘आवो जावो घर तुम्हारा’ अनेक शिक्षक बऱ्याच वर्षांपासून एकाच शाळेत स्थाईक असल्याने त्या शिक्षकांचे चांगलेच हात- पाय पसरल्याने त्यांना आवरणे सामान्यांसाठी अवघडच आहे.
एकडे शाळा सुरू तर इकडे काही शिक्षक गावातल्या ‘पानटपरी’ तंबाखूला चुना लावत बसतात. वर्गात शिकवताना काही मास्तरांच्या तोंडात बार, तंबाखू तर काहींच्या तोंडात ढीगभर गुटका डांबून ठेवला असतो. अशा परिस्थितीत ते वर्गावर विद्यार्थ्यांना काय शिकवणार? अशा शिक्षकाकडून आदर्श विद्यार्थी कसा घडणार? अशा शिक्षकाकडून विद्यार्थ्याने काय बोध घ्यावा. अशा शिक्षकांना पाठीशी घालतय तरी कोण? एकदम चीडीचुप असलेल्या मुख्याध्यापकांना हे डोळ्यांनी दिसत असताना सुध्दा एक शब्द तोंडातून निघत नाही राजकीय कळीने कुलूप ठोकले म्हणायला काही हरकत नाही…चाललय चाललय भलतचं काही चाललंय… भाग 5 उद्या (संपादक रजनीकांत पाटील)