चोपडा दि.०३(प्रतिनिधी ) शहरातील स्व.तुळसाई बहुउद्देशीय महिला मंडळ संचलित मुकबधीर विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेश पी.शिरसाठ यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येवून चित्रकला स्पर्धेत विविध स्पर्धा घेण्यात येवून
जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रारंभी दिव्यांगावर मात करून आपल्या कार्याच्या ठसा उमटविणाऱ्या हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी श्री.महेशभाऊ शिरसाठ यांच्या शुभहस्ते होऊन विद्यार्थ्यांची कॉलनी परिसरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. भावलाल पाकळेसर व मुख्याध्यापिका सौ.नम्रता धनगर हयांनी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्या मागील महत्वपूर्ण माहिती विषद करून दिव्यांग व्यक्तींनी स्वतःतील न्यूनगंड दूर सारून मोठ्या धैर्याने जग जिंकावे यावर मार्गदर्शन केले.
यावेळी संस्था अध्यक्ष सौ.लिलाताई पाकळे, चोपडा तहसीलचे रावसाहेब हेमंत हरपे, माजी मुख्याध्यापक आर.बी.भवराळे, संचालिका सौ.वैशाली हरपे ,शुभम साळुंखे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
चित्रकला स्पर्धेत नेहा पाटील प्रथम
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यालयातर्फे चित्र रंगवा स्पर्धा घेण्यात आली.त्यात परिक्षक महेश शिरसाठ यांच्या हस्ते परिक्षण होऊन कु.नेहा पाटील या विद्यार्थीला प्रथत घोषित करुन शालेय साहित्य पारितोषिक म्हणून देण्यात आले.
दिव्यांग सेना पुरस्काराबद्दल महेश शिरसाठ यांचा गौरव
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत दिव्यांगसेना राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार महेश शिरसाठ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्या.सौ.नम्रता धनगर यांनी तर आभार श्री.भावलाल पाकळेसर यांनी मानले