शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे , केंद्र सरकारने खत कंपन्यांना नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत

तसे पत्र खत कंपन्यांच्या सीईओंना पाठवले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दोन पैसे वाचतील, तसेच खताबाबत भारत स्वयंपूर्ण होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे
आणखी काय सांगितले केंद्र सरकारने
नॅनो युरियावर केंद्र सरकारला कोणतेही अनुदान द्यावे लागत नाही. शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर सुरु केल्यास सरकारवरील अनुदानाचा भार कमी होईल.
युरियाच्या गोणीची किंमत सरकारी अनुदानासह 266 रुपये आहे. मात्र, नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक गोणीमागे 41 रुपये वाचणार आहेत. नॅनो युरियाची अर्ध्या बाटलीची किंमत साधारण 225 रुपये असू शकते, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे

