जळगाव : रेल्वे स्थानक नवा दादरावर एक अनोळखी पुरुषाचा आढळला मृतदेह

सविस्तर वृत्त असे की जळगाव रेल्वे स्थानकावर नव्या दादरा वर काल शुक्रवार रोजी सकाळी 11:40 च्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळला घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली असता. सदर पुरुष अनोळखी असल्याचे समजले. सदरच्या मृतदेहाला जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. याबाबत सदर पुरुषाचे वर्णन अंदाजित वय-40, रंग सावळा, उंची 5 फूट 4 इंच, अंगावर निळे व पिवळ्या रंगाचे शर्ट, नेसणीस निळी जीन्स पॅन्ट उजव्या हातावर श्रीराम व ओम स्वरूपाचा नक्षी गोंदलेला कुठल्यातरी आजाराने मयत झाला असावा. या अनोळखी पुरुषाचे ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे. याबाबत पुढील तपास पो. ना.करीत आहे

