जळगाव (प्रतिनिधी): भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ आय टी अँड कम्युनिकेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे डाक सेवा कार्यालय प्लॅटफॉर्म क्रमांक -३ येथे महिलांना कार्यस्थळी होणाऱ्या लैगिक अत्याचार कायदा-२०१३ याबद्दल जनजागृती व सखोल चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले यामध्ये मार्गदर्शन साठी प्रमुख म्हणून - अॕड- श्रद्धा काबरा मॅडम यांनी कामाचा ठीकाणी महीलांवर होणार्या लैंगिक शोषण कायदा 2013 बद्दल सविस्तर माहीती दिली त्या एक सिनिअर वकील आहेत व विविध संस्थान मधे कार्यरत आहेत,

- भारती कुमावत मॅडम समांतर विधी साहाय्यक पोक्सो कमिटी सदस्य मानव अधिकार उत्तर महाराष्ट् महीला अध्यक्ष कुमावत बेलदार समाज महाराष्ट् महीला सचिव बारा बलुतेदार महीला जिल्हा अध्यक्ष
यांनी महीला व बाल लैंगिक अत्याचार व 376 पोक्सो कलम अंतर्गत विस्तृत मार्गदर्शन केले व महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्न,शंकाचे निराकरण व मार्गदर्शन केले
या कार्यक्रमास रेल्वे पोलीस फोर्स च्या वतीने सौ कदम मॅडम ,ज्योती इंगळे मॅडम , RMS कार्यालयाचा प्रियांका मॅडम,उपस्थित होते ..
कार्यक्रम यशस्वी पने संपन्न होण्यासाठी सब रेकॉर्ड ऑफिसर श्री ए बी जाधव, श्री एस डी कोल्हेकर , कॅशियर व चेकर श्री . दिपक डी पाटील व बी व्ही सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले ..

