शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यावर माणूस डरकाळी फोडल्या शिवाय राहणार नाही’!…. हे वाक्य ऐकल्यावर आजही प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात!कारण शिक्षणाची ताकद हि प्रत्येकाने जाणली आहे मात्र हल्ली शिक्षणाचा झालेला बट्ट्याबोळ सर्वत्र ठाऊक आहे मात्र यावर आवाज उठवणार तरी कोण? आणि आवाज उठवला तरी यात काही बदल होताना दिसतोय का? असा प्रश्न विचारल्यास प्रत्येकजण निरुत्तरच ठरणार यात शंका नाही.पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत शिक्षणावर जो विशेष भर दिला जायचा तो आता मुळीच राहिला नसून शिक्षण म्हणजे केवळ एक उत्पन्नाचे साधन झाले आहे हे सर्वत्र पाहावयास मिळते.
अमळनेर तालुक्यातली ही शाळा शाळेला पुरस्कार मिळावा यासाठी गावात कार्यक्रम घेतले जातात मात्र पुरस्कार मिळाला की सगळं थक्क होऊन जात शाळा डिजिटल बनवण्यासाठी लोकसहभाग लोकवर्गणीतून हजार रुपये जमा केले जातात मात्र त्या लोकवर्गणीतून आणलेल्या वस्तू या धुळखात पडतात याचा विद्यार्थ्यांना कुठलाही फायदा होत नाही तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बुद्धीचा विकास कसा होणार.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विज्ञानासाठी काही साहित्य दिलेले आहे उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊन वैज्ञानिक विकास व्हावा परंतु त्यालाही हरताळ फासण्याचा अनेक महाभाग प्रयत्न करतात व शासनाने खर्च केलेला पैसा पूर्णपणे वाया घालवत आहेत. स्वतःच्या मुलांची वाताहत अशी होत असेल तर आपण मान्य करणार का? जर परमेश्वरा असेल तर तो तरी आपल्याला माफ करेल का हे साधे प्रश्न आपण जर विचारले तर प्रामाणिकपणे आपल्याला उत्तर मिळणार आहे. गावकऱ्यांची अपेक्षा एकच शाळेला गतवैभव प्राप्त करून शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अनेक प्रयोग केले गेले पाहिजे. असे केले तर गाव निश्चितपणे आपल्याला डोक्यावर धरेल व शिक्षक नाव समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही…….भाग ४ वाचा उद्या (संपादक: रजनीकांत पाटील)