पाचोरा: तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्याची गर्भवती झाल्याची खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ॲट्रासीटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नराधम आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
सविस्तर तालुक्यातील एका गावात मागासवर्गीय समाजातील २२ वर्षीय गतीमंद तरूणीवर गावातच राहणाऱ्या ज्योतीराम पांडूरंग पाटील (वय-२५) हा मागील ४ ते ५ महिन्यांपासून मध्यरात्री पिडीतेची आई झोपेत असतांना तिच्यावर अत्याचाराचा करत होता. दोन महिन्यापूर्वी पिडीतेच्या नातेवाईकांनी ज्योतीराम पाटील यला दुष्कृत्य करतांना रंगेहात पकडले होते. याबाबत गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी त्याला समज देण्यात आली होती. नंतर पोळ्याच्या आदल्या दिवशी पिडीत तरुणी व तिची आई या दोघेजण आजारी पडल्या होत्या. त्यानंतर पिडीता आजारी पडल्यामुळे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पिडीत मुलगी ही तीन महिन्याची गर्भवती झाल्याचे आढळले
यासंदर्भात पिडीत तरुणीच्या नातेवाईकांनी गावातील पंचासमोर घटना कथन केल्यानंतर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याला पिडीतेसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. परंतू त्याने लग्नाचा प्रस्ताव नाकार दिला. अखेर पिडीत मुलीच्या आईने पाचोरा पोलीस ठाणे गाठले व गुन्हा दाखल केला. व संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याच्या विरोधात अॅट्रासीटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक भरत काकडे हे करीत आहे.