आपल्या भारतामध्ये राज्यघटनेला फार महत्त्व आहे संविधान नुसारच सर्व गोष्टी सर्व कायदे पाळले जातात व त्यानुसारच पूर्ण लोकशाहीचा कारभार सुरू आहे.परंतु प्रश्न असा पडतो की, पोलीस कोणालाही मारू शकतात का? याचे उत्तर आहे.. नाही पोलिसांना मारण्याचे अधिकार काही केसेस मध्ये आरोपींनी गुन्हा कबूल करावा. यासाठी दिलेले आहेत.परंतु तेही अशा प्रमाणे मारू शकतात की जो आरोपी आहे..
त्यांचे रक्त निघू नये.मुका मार मारु शकतात. काही केसेस मध्ये जसे की चोरी,दरोडा,बलात्कार खून मडर असल्या केसेस मधल्या एका चोराला पकडले असतांना फरार झालेले आरोपींना पकडण्यासाठी चोरीचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा गुन्ह्याचा
तपास लावण्यासाठी पोलीस काही वेळेस जोरात बोलणे व आरोपीला मारणे असं करू शकतात.. पण सर्वसाधारण माणसाला पोलीस हातही लावू शकत नाही. कारण त्यांना साध्या केसेस मध्ये जनतेला मारण्याचा तथा धमकवण्याचा अधिकार नसतो. आणि असे जर होत असेल कोणी पोलीस तुमच्यावर अन्याय करत असेल लॉकअपमध्ये मारले असेल तर तुम्ही न्यायधीशा समोर ही बाब उघड केली पाहिजे.
किंवा जेव्हा आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये अटक केली जाते तेव्हा
दवाखान्यात त्यांना तपासण्यासाठी नेले जातात आणि जेव्हा कोर्टात हजर करण्यासाठी नेतात.तेव्हा देखील त्यांना दवाखान्यात तपासण्यासाठी नेले जातात. तेव्हा तुम्ही डॉक्टरांना पोलिसांनी मारले आहे किंवा नाही हे सांगू शकतात. कारण डॉक्टर देखील
तसे सर्टिफिकेट देवुन सहकार्य करतात त्यामुळे पोलिसांवर कारवाई होऊ शकते.
तेव्हा तुम्हाला योग्य न्याय मिळतो.जोपर्यंत कोर्टाकडून पोलीस कस्टडी म्हणजेच पीसीआर दिली जात नाही. तोपर्यंत ते आरोपींना कबुल करण्यासाठी सर्वसाधारण गुन्ह्यांमध्ये मारू शकत नाही. वास्तविक गुन्ह्याचा तपास व्हावा त्यासाठी( PCR) म्हणजे पोलीस कस्टडी दिला जातो.परंतु त्या सर्वसाधारण केसेस मध्ये आरोपींना
पोलिसांना मारण्याचा अधिकार नसतो.फक्त त्यांना पोलीस खाक्या दाखवून ते आरोपींना धमकवू शकतात.धाक दाखवू शकतात.परंतु खून,मर्डर,बलात्कार दरोडा चोरी सारखा प्रकरणा मधील आरोपींना ते धमकून थोडं मारूही शकतात.सक्ती करू शकतात. याचा अर्थ लॉकअपमध्ये मारून टाकतील असं होत नाही आणि असं जर झालं तर तुम्ही मानवी हक्क आयोगाकडे देखील न्याय मागू शकतात. पण काही केसेस मध्ये मारणे,धमकावणे हा तपासाचा भाग असतो. बरेचसे केसेस मध्ये विनाकारण लोकांना गोवले जाते.त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल करुन पैशांची मागणी करतात.अनेक वेळा पोलीस आपल्या पदाचा दुरुपयोग करून पैशासाठी लोकांना लॉकअप मध्ये टाकण्याची धमकी देतात.पण ते राज्यघटनेनुसार किंवा
संविधानानुसार असं करू शकत नाही.लोकांना कायद्याची जाणीव नसल्यामुळे लोक घाबरतात.पण पोलीस कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणालाही काहीही करू शकत नाही. पोलीस हा जनतेच्या सुरक्षिततेसाठी नेमलेला शिपाई आहे. गावामध्ये शहरांमध्ये शांतता प्रस्थापित राहावी गुन्हे घडू नये..
यासाठी पोलिसांची नेमणूक केलेली असते. कायदा सुव्यवस्था सुरळीत चालावा यासाठी पोलिसांची नेमणूक असते. परंतु काही पोलीस आपल्या पदाचा दुरुपयोग करून सर्वसाधारण जनतेला त्रास देतात आणि लोकांना घाबरतात परंतु मित्रांनो कायद्याच्या बंधनात राहूनच पोलिसांना कारवाई करावी लागते. याचा अर्थ असा नव्हे की सर्वच पोलीस भ्रष्ट असतात.काही इमानदार पोलीस देखील आहेत. त्यामुळे पोलिसांचा आदर करायला हवा व त्यांन ज्यावेळेस आपल्याकडून माहितीची आवश्यकता असेल किंवा सहकार्याची गरज असेल तेव्हा त्यांना सहकार्य करायलाच पाहिजे.परंतु जे भ्रष्ट अधिकारी आहेत.त्यांना धडाही शिकवायला हवा आणि पोलिसांनी देखील जनतेमध्ये त्यांची आदरयुक्त भीती असायला हवी असंच वागावे जेणेकरून लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आबादीत राहील.