• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा सप्ताहात मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न ; उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 13, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सप्ताहात मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न ; उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद

जळगाव, ता. १३ : केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या् वतीने देशभरात सप्टेंबर महिन्यात ‘राष्ट्रीय पोषण अभियान’  राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या अनुषंगाने सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये दिनांक ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी आहारतज्ञ व पोषणतज्ञ डॉ.आदित्य जहागीरदार व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना आहाराचे महत्त्व कळावे म्हणून आरोग्यदायी संतुलित आहाराचे महत्त्व, त्याचबरोबर कुपोषण व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम या विषयावर डॉ. जहागीरदार यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विध्यार्थ्यांना केले. या सप्ताहात डॉ. प्रिया पटनी व इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव शाखेच्या सहकार्याने विध्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर देखील घेण्यात आले. या शिबीराला विद्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी इंडियन डेंटल असोसिएशन पथकातील डॉक्टरांच्या टीमने शिबीरात पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांना टूथपेस्ट आणि टुथब्रशने दातांची निगा कशी राखावी याबद्दल माहिती देवून या पथकाने प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. काही विद्यार्थ्यांना दातांची समस्या होती त्यांना पुढील उपचाराकारिता इंडियन डेंटल असोसिएशनमधील डॉक्टरांच्या रूग्णालयात पालकांना सोबत घेऊन येण्यास डॉक्टरांनी सांगितले. या उपक्रमासाठी आरती पाटील, प्रशांत महाशब्दे, सविता तायडे यांनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Previous Post

खळळजनक..! सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून ; न्यायासाठी पित्याने तब्बल ४२ दिवसापासून मृतदेह जतन केला मिठाच्या खड्ड्यात !

Next Post

पोलीस कोणालाही मारू शकतात का ? थोड कायद्याविषयी

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

पोलीस कोणालाही मारू शकतात का ? थोड कायद्याविषयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!