• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

नांद्रीजवळ डंपर अंगावर घालून ५२ वर्षीय व्यक्तीला चिरडले

policevrutta by policevrutta
November 1, 2026
in अमळनेर, क्राईम, खान्देश, चोपडा, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
नांद्रीजवळ डंपर अंगावर घालून ५२ वर्षीय व्यक्तीला चिरडले
0
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : जुन्या वादातून चौघांनी संगनमत करून डंपर अंगावर घातल्याने नगाव येथील शरद रतन पाटील (५२) यांचा मृत्यू झाल्याची घटना नांद्री बसस्थानकाजवळ ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी विपुल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर संजय गोसावी आणि भरत सुभाष पाटील (सर्व रा. नगाव) यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर काळुगीर गोसावी (५१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी वाळूचे ट्रॅक्टर मागे घेताना धक्का लागल्याच्या कारणावरून विपुल गोसावी, सागर गोसावी व मयूर बोरसे यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आली होती. या घटनेचे साक्षीदार असलेल्या शरद पाटील यांना दुसऱ्या दिवशी विपुल गोसावी याने रस्त्यावर भेटल्यास चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
३१ ऑक्टोबर रोजी नगाव खुर्दचे पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फिर्यादीसह शरद पाटील व अन्य ग्रामस्थ देव हॉटेलकडे जात होते. रात्री ९.४५ वाजता नांद्री बसस्थानकाजवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी ते थांबले असताना पातोंड्याकडून आलेल्या राखाडी रंगाच्या मारुती कारमधून विपुल गोसावी, मयूर बोरसे व सागर गोसावी उतरले. त्यांच्या पाठोपाठ एचआर-३७-डी-८९५७ क्रमांकाचा डंपरही तेथे आला. डंपर चालक भरत पाटील याने ग्रामस्थांना शिवीगाळ केली.

यावेळी झालेल्या वादात विपुल गोसावी याने डंपर चालकाला ग्रामस्थांना उडवून देण्यास सांगितले, तर मयूर बोरसे व सागर गोसावी यांनीही त्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर चालकाने डंपर वेगाने ग्रामस्थांच्या दिशेने नेला. विपुल गोसावी व मयूर बोरसे यांनी शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलले, तर सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
डंपर शरद पाटील यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर चौघेही कार व डंपरसह अमळनेरच्या दिशेने पसार झाले. जखमी शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेने अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ज्ञानेश्वर गोसावी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुरनं. ५६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९, ३५१(२), ३५२ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

भोकर एसबीआय दरोड्याचा थरार; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली : दोन तासांत चौघे जेरबंद!

Next Post

न्यायालयांना बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क!

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • रस्ता बिलासाठी १० हजारांची लाच; जिल्हा परिषदेचे दोन अभियंते एसीबीच्या जाळ्या
  • गोवंश कत्तल प्रकरणी टोळीप्रमुखासह महिलेला सहा महिने हद्दपार
  • न्यायालयांना बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क!
  • नांद्रीजवळ डंपर अंगावर घालून ५२ वर्षीय व्यक्तीला चिरडले
  • भोकर एसबीआय दरोड्याचा थरार; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली : दोन तासांत चौघे जेरबंद!
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!