• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बद्रीनाथ यात्रा ठरली अखेरची; पोलीस निरीक्षकासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

policevrutta by policevrutta
October 30, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
बद्रीनाथ यात्रा ठरली अखेरची; पोलीस निरीक्षकासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तराखंड : बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन डेहराडूनच्या दिशेने परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा चमोली जिल्ह्यातील जोशीमठजवळील दुर्गम डोंगराळ भागात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कर्नाटक पोलीस दलाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांचा समावेश आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह बेळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ट्रान्स भारत एव्हिएशन’ या खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनकडे निघाले होते. दुपारी सुमारे दोन वाजता चमोली जिल्ह्यातील हत्ती पर्वत परिसरात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा भाग अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच भारतीय सेना, स्थानिक पोलीस आणि आरोग्य यंत्रणेची पथके घटनास्थळी दाखल झाली. प्रतिकूल हवामानात शोधमोहीम राबवून सर्व सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले.

तीन दिवसांपूर्वीच गेले होते बद्रीनाथ यात्रेला….
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे हे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथाणी तालुक्यातील आरताळ गावचे रहिवासी होते. २००७ च्या बॅचचे कर्नाटक पोलीस अधिकारी असलेल्या साळुंखे यांनी यापूर्वी दिल्लीत गुप्तचर विभागातही सेवा बजावली होती. सध्या ते बंगळुरूच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
साळुंखे यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच त्यांच्या आरताळ गावासह संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघाताची बातमी मिळाली. सुरुवातीला ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वीच ते बद्रीनाथ यात्रेसाठी गेले होते आणि शुक्रवारी परतणार होते. मात्र, परतीच्या प्रवासातच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Previous Post

मुलीसाठी मुलगा पाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह लेकीचा जागेवरच मृत्यू

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बद्रीनाथ यात्रा ठरली अखेरची; पोलीस निरीक्षकासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू
  • मुलीसाठी मुलगा पाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह लेकीचा जागेवरच मृत्यू
  • 1. चोपड्यात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; एकाला बेड्या
  • मजुरी बुडू नये म्हणून १०७ महिलांनी काढले गर्भाशय!
  • अमळनेरच्या इंजिनियर तरुणाचा नाशिकमध्ये दुर्दैवी अंत; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीने खळबळ तरुणीसह चौघांविरुद्ध गुन्हा
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!