• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अमळनेरच्या इंजिनियर तरुणाचा नाशिकमध्ये दुर्दैवी अंत; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीने खळबळ तरुणीसह चौघांविरुद्ध गुन्हा

policevrutta by policevrutta
October 28, 2026
in Uncategorized, अमळनेर, क्राईम, नाशिक
0
अमळनेरच्या इंजिनियर तरुणाचा नाशिकमध्ये दुर्दैवी अंत; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीने खळबळ तरुणीसह चौघांविरुद्ध गुन्हा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक:शहरात एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत तरुण हा इलेक्ट्रिकल डिप्लोमा करून एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. या प्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका तरुणीसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवन राजेंद्र देसले (वय २८, मूळ रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन हा नाशिक येथे नोकरी करत होता. तो पंधरा दिवसांनी गावी आई-वडिलांना भेटण्यासाठी जायचा. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याच्या नाशिकच्या खोलीत राहणारा हर्षल जैन याने मित्राच्या फोनवरून वडिलांना फोन करून पवनने खोलीत गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली असता, हा दुर्दैवी प्रकार समोर आला. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार त्याचे वडील राजेंद्र देसले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पवन २० ऑक्टोबर रोजी गावी गेला असताना मानसिक तणावाखाली असल्याचे त्याच्या आई-वडिलांच्या निदर्शनास आले. आई-वडिलांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली होती. त्याने ओळखीतील व्यक्ती संशयित जयदीप पाटील, हेमंत जाधव अन्य दोन तरुणी हे चारही जण सातत्याने त्रास देत असून, धमकावत असल्याचे सांगितले होते. या त्रासाला व धमकीला कंटाळूनच पवनने टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून, पुढील तपास सुरू आहे.

त्यांना सोडू नका’
यांच्यामुळे मी सर्व काही करतो आहे. हे वारंवार मला त्रास देत होते. मला जयदीपने मारले होते. दोन-तीनदा तरुणीच्या सांगणे वरून. दुसऱ्या तरुणीला मी खूप पैसे दिले आहे. पण, तिने मला ‘फोन-पे’ वरही ब्लॉक केले आहे. म्हणून काही ट्रान्सॅक्शन नाही दिसणार. नावे घेत सांगितले की यांना सोडू नका…’, असे आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत नावासहित नमूद आहे.

Previous Post

तीन महिन्यांपूर्वी लग्न, काळाने हिरावला संसाराचा आधार!

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अमळनेरच्या इंजिनियर तरुणाचा नाशिकमध्ये दुर्दैवी अंत; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीने खळबळ तरुणीसह चौघांविरुद्ध गुन्हा
  • तीन महिन्यांपूर्वी लग्न, काळाने हिरावला संसाराचा आधार!
  • 1. पती-मुलाच्या हत्येची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; अमळनेरात गुन्हा दाखल
  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!