चोपडा : पोलीस वृत्त- शहरालगत धनवाडी शिवारातील एका शेडच्या गोदामात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर चोपडा शहर पोलिसांनी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालविल्याच्या आरोपावरून जगन्नाथ जानकीराम महाजन याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक युवराज वाळुंज यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी छाप्यात सहभाग घेतला. धनवाडी शिवारातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

