• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

लेकाला वाचविण्याची धडपड ठरली अखेरची; खवशी तलावात बाप-लेकाचा मृत्यू

policevrutta by policevrutta
August 27, 2026
in अमळनेर, क्राईम
0
लेकाला वाचविण्याची धडपड ठरली अखेरची; खवशी तलावात बाप-लेकाचा मृत्यू
0
SHARES
486
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: तालुक्यातील खवशी गावातील तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली. विरेंद्र उर्फ विरू अण्णा तलवारे (७) हा तलावाच्या पाण्यात उतरल्याचे लक्षात येताच त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (३२) यांनी मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तलावातील गाळात दोघेही अडकल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विरू सकाळी तलावाजवळ खेळत होता. खेळता खेळता तो अचानक तलावाच्या पाण्यात उतरला. मुलगा पाण्यात गेल्याचे निदर्शनास येताच अण्णा तलवारे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली. मात्र, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने दोघेही त्यात अडकले. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही जीव गेला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. या घटनेने खवशी गावावर शोककळा पसरली असून, तलावातील गाळ आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अण्णा तलवारे आणि त्यांचा मुलगा विरू हे मूळचे आर्वी, ता. जि. धुळे येथील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या अण्णा तलवारे यांच्या सासुरवाडी असलेल्या खवशी येथे वास्तव्यास होते. या दुर्दैवी घटनेने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बाप-लेकाच्या अकाली निधनाने खवशीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत; टाकरखेड्यात शोककळा

Next Post

शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

policevrutta

policevrutta

Next Post
शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!