• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

मंत्री गिरीश महाजनांचे मॉर्फ फोटो व्हायरल; दोषींवर कारवाईची मागणी

policevrutta by policevrutta
June 22, 2026
in अमळनेर, क्राईम
0
मंत्री गिरीश महाजनांचे मॉर्फ फोटो व्हायरल; दोषींवर कारवाईची मागणी
0
SHARES
371
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाइन – राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी खासदार स्मिता वाघ उपस्थित होत्या.

भाजपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर काही उपद्रवी व्यक्तींमार्फत प्रसारित केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका राजकीय व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असून, यामागील संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारचे फोटो प्रसारित करणाऱ्यांसह ते जाणूनबुजून लाईक, शेअर अथवा व्हायरल करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. समाजात दिशाभूल करणारी व द्वेषपूर्ण माहिती पसरविणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडळ अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, डॉ. अनिल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, गिरीश पाटील, बाजार समिती संचालक प्रफुल पवार, हिरालाल पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, देवा लांडगे, विजय राजपूत, अमोल पाटील, राहुल चौधरी, भरतसिंग परदेशी, श्रीनिवास मोरे, भारती सोनवणे, माधुरी पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शविआ‌’च्या बैठकीला ‌‘खो‌’ देऊन मुख्याधिकारी बदलीसाठी मुंबईला?


‌‘शविआ‌’तर्फे निषेध; आता संयमित भूमिकेऐवजी घेणार आक्रमक पावित्रा

Next Post

पाळधीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

policevrutta

policevrutta

Next Post
पाळधीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

पाळधीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्यस्तरीय ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने मनोजकुमार वानखेडे यांचा गौरव
  • आम्हाला वाचवा…’ तो कॉल कट झाला अन् गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली! आई-दोन मुलींचा दुर्दैवी अंत
  • शिरूडला मुसळधार पावसाचा तडाखा; घरे, अंगणवाडी, गोठे जलमय, शेती पाण्याखाली
  • ब्रेकिंग : मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–सुरत रेल्वे वाहतूक ठप्प, अमळनेर येथे पटना–बांद्रा एक्सप्रेस थांबली
  • भगवा चौकात विद्युत दुरुस्तीदरम्यान वायरमनचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा प्रांत कार्यालयात ठिय्या
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!