पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज : सोलापूर जिल्ह्यात ४१ गावे आठ दिवस अंधारात
सीना नदीला आलेल्या पुरामुळे महावितरणच्या ५ सबस्टेशनमध्ये पाणी शिरले.
१३२९ ट्रान्स्फॉर्मरमध्ये पाणी, तर ६० हून अधिक ट्रान्स्फॉर्मर पुरात वाहून गेले.
४१ गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित.
चिखलामुळे सबस्टेशन दुरुस्तीला अडथळे; किमान ८ दिवस वीजपुरवठा बंद राहणार.
महावितरणचे दोन कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान.
शेतकऱ्यांचे संकट
नदीकाठी स्वतःच्या खर्चाने बसवलेले ट्रान्स्फॉर्मरही नादुरुस्त.
दीड हजार ट्रान्स्फॉर्मर पाण्याखाली.
शेतकऱ्यांची मागणी – सरकारने नवे ट्रान्स्फॉर्मर बसवून द्यावेत.
प्रभावित गावे
आवाटी सबस्टेशन : नेर्ले, आवाटी, निमगाव, गावंधरे
भांबेवाडी : भांबेवाडी, अष्टे, खुनेश्वर, मलिकपेठ, हिंगणी
औराद : औराद, संजवाड
कुंभेज : कुंभेज, खैराव, वाकाव
लांबोटी : श्रीपूर, लांबोटी, अर्जुनसोंड, साबळेवाडी, सावळेश्वर, मुंढेवाडी, मोरवंची, रामहिंगणी
वडकबाळ : वडकबाळ, हत्तूर, वांगी, मनगोळी, राजूर, सिंदखेड, व्हनमूर्गी, संजवाड, बंदलगी
कोर्सेगाव : कोर्सेगाव, शेगाव, सुलेरजवळगे, उबांटे, कलकर्जाळ, नजीकचिंचोली, केगाव बु., केगाव खु.
गुड्डेवाडी : गुड्डेवाडी, आळगी, अंकलगी


