• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अतिवृष्टीचा कहर : पाचोर्‍यात मामी-भाची नदीत वाहून गेल्या, आजोबांचा धक्क्यात मृत्यू

policevrutta by policevrutta
September 19, 2025
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण, पाचोरा, ब्रेकिंग, भडगाव
0
अतिवृष्टीचा कहर : पाचोर्‍यात मामी-भाची नदीत वाहून गेल्या, आजोबांचा धक्क्यात मृत्यू
0
SHARES
463
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : पोलीस वृत्त न्यूज जिल्ह्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक जनावरेही पाण्यात वाहून गेली आहेत. आज (शुक्रवार) पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे हिवरानदीला अचानक पूर आल्याने मामी आणि भाची वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.
यामध्ये 35 वर्षीय मामीला ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात आले, मात्र 15 वर्षीय भाची पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली.
नदी पार करताना अपघात
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास निकिता भालेराव (वय 15) आणि तिची मामी सरला खरे (वय 35) शेतातून परत येत होत्या. हिवरानदी ओलांडत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि दोघी वाहून गेल्या. तत्काळ धाव घेतलेल्या ग्रामस्थांनी सरला खरे यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र निकिता पाण्यात वाहून गेली.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग आणि नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तीन तासांपासून निकिताचा शोध सुरू असून ग्रामस्थही मदतकार्य करत आहेत.
नातीच्या धक्क्याने आजोबांचा मृत्यू
दरम्यान, नात वाहून गेल्याची बातमी कळताच निकिताचे आजोबा श्यामराव खरे (वय 65) यांना मोठा धक्का बसला. या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे.
प्रशासनावर ग्रामस्थांचा रोष
घटनेनंतर दोन तासांपर्यंत कोणतीही शासकीय मदत पोहोचली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाले धोकादायक पातळीवर असतानाही प्रशासन सज्ज नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Previous Post

जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता : संदीप काळे

Next Post

या राशीसाठी नवीन संधी हाताशी येतील, तर यांनी वाद विवाद टाळावे

policevrutta

policevrutta

Next Post
या राशीसाठी नवीन संधी हाताशी येतील, तर यांनी वाद विवाद टाळावे

या राशीसाठी नवीन संधी हाताशी येतील, तर यांनी वाद विवाद टाळावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!