पाचोरा दि. 06 – पाचोरा येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा व ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक महिला दिना’निमित्त महिला व मुलींसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 08 मार्च पासून महाविद्यालयात करण्यात आले आहे. ‘देशात डिजिटल क्रांती झाली, घरोघरी डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली, डिजिटल शिक्षण देऊया भारताला जगात महासत्ता बनवूया’ डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे समोर येत आहेत. याबाबत अजूनही महिलांमध्ये अनभिज्ञता आहे. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत जनजागृती केली जात असली तरी अजूनही महिलांना याबाबत पुरेसे ज्ञान नाही. यासाठी संस्था ‘सायबर लर्निग कोर्स’च्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘Cyber Security Professional Basic Online Cours’ हे प्रशिक्षण मोफत देत आहे. या कोर्सचा कालावधी 10 दिवस असून रोज दुपारी 01 ते 01:30 तासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता सातवी पास व वय मर्यादा 14 वर्षापुढील आहे.
कोर्सच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे –
1) आधारकार्ड, 2) शैक्षणिक पुरावा, 3) 02 पासपोर्ट फोटो
सहभागी प्रत्येक विद्यार्थी व महिलेस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून दि. 08 मार्च रोजी महाविद्यालयाच्या ICT सभागृहात ‘सायबर सेक्युरिटी कोर्स’चे उद्घाटन माजी आमदार व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ, चेअरमन श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, प्राचार्य डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी पाचोरा उपविभागीय अधिकारी श्री. धनंजय येरुळे साहेब, पोलीस निरीक्षक श्री. अशोक कचरू पवार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे साहेब, जळगाव सायबर सेल पोलीस निरीक्षक साहेब व बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा सहाय्यक व्यवस्थापक श्री. पराग सर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमासाठी जास्तीत-जास्त महिला व मुलींनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. जयश्रीताई वाघ यांनी केले आहे.
*प्रशिक्षण दोन ठिकाणी घेण्यात येणार आहे.*
1) नेटवर्क अकॅडमी, प्रकाश टॉकीजच्या बाजूला, जेडीसीसी बँकेच्या समोर, देशमुखवाडी, पाचोरा
दूरध्वनी क्र. 02596-240222
2) संगणक विभाग, श्री. शेठ मु. मा. महाविद्यालय, पाचोरा
संपर्क :- प्रा. अक्षय शेंडे
भ्रमण – 8788019266,
श्री. सागर सर
भ्रमण – 9422094522
*टीप :-* प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.


