अमळनेर – पोलीस वृत्त न्युज “गाव करी ते राव काय करी?” असे म्हटले जाते. याच उक्तीच्या पार्श्वभूमीवर नव तरुणांनी एकत्र येत अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल्या गावातील विद्यार्थी भविष्यात अधिकारी होतील यासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे आले. त्यांच्या दातृत्वातून अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे.
शिरुड (ता. अमळनेर) येथे “श्री.छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेचे रविवारी मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले. “एक वीट माझी” या उपक्रमाचे सर्वेसर्वा तथा शारदा मॅथ्स क्लासेसचे संचालक गौरव महाले व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे यांच्या हस्ते फीत कापून अभ्यासिका चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशन चे खजिनदार योगेश्वर पाटील, सदस्य दीपक भोई, शिरूड चे सरपंच गोविंदा सोनवणे, उपसरपंच कल्याणी पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापूराव महाजन, बाजार समितीचे माजी संचालक डी ए धनगर, इंजि. प्रफुल्ल पाटील, कल्पेश माळी, नरेंद्र पाटील, विनायक पाटील, सुरेखा पाटील, किरण पाटील आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस भरतीत निवड झालेला गौरव सुनील पाटील तसेच ‘सीआय एसएफ’ मध्ये निवड झालेला सतीश खंडू पाटील या दोघांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अभ्यासिकेसाठी विशेष मेहनत घेणारे किरण पाटील व डी ए धनगर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गौरव महाले यांनी विद्यार्थ्यांना जीवनात मोठे स्वप्न पाहण्याचे आव्हान केले. दातृत्वातून उभारलेल्या अभ्यासिकेच्या माध्यमातून भविष्यात स्पर्धा परीक्षेत मोठ्या पदांवर जा अन दातृत्वाची परतफेड करा. यावेळी त्यांनी एक वीट माझी या अनोख्या उपक्रमाचे माहिती दिली. उमेश काटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, स्पर्धा परीक्षेच्या काटेरी वाटेवर जाताना जिद्द, चिकाटीला कठोर परिश्रमाची जोड मिळाली तर यश आपोआप मिळेल. अभ्यास करताना मोबाईल अर्थात सोशल मीडियापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. डी ए धनगर यांनी प्रास्ताविक केले. कल्पेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. किरण पाटील यांनी आभार मानले.
——–
शिरुड (ता. अमळनेर) – वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित गौरव महाले, उमेश काटे, डी ए धनगर, प्रफुल्ल पाटील, किरण पाटील आदी


