• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अतिवृष्टी! पातोंडा- सावखेडा हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 9, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
0
SHARES
279
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: तालुक्यातील पातोंडा महसूल मंडळात पातोंडासह सावखेडा, दापोरी, मठगव्हाण, रुंधाटी, नांद्री, खवशी,जळोद परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीच्या मुसळधार पावसाच्या थैमानामुळे हजारो हेक्टरवरती शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवरती मोठ्या आस्मानी संकट कोसळले असून संपूर्ण शेती पाण्याखाली व पिके पाण्यात तरंगताना पाहुन बळीराजा अस्वस्थ झालेला आहे चिंतेत आहे. कृषी व महसूल विभागाने पंचांनाम्याचे आदेश दिले असून तात्काळ पंचनामे करून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात अमळनेर तालुक्यातून पातोंडा परिसरात शंभर मिमीच्या वर पाऊस पडत आहे. रिमझिम पावसाने शेतामध्ये सर्वत्र तण वाढले होते. परिणामी मजुरांची टंचाई भासत होती. म्हणून सकाळ संध्याकाळ पर्यंत मजूर शेतामध्ये दिसून येत होते.उन्हाळा सारखे ऊन, उष्णतेच्या प्रचंड लाटा व घामाने नागरिक त्रस्त झाले होते. पावसाच्या विश्रांतीत शेतकऱ्यांना शेतीची मशागती करता आली. निंदणी, खत देणे,फवारणी करणे आदी कामात शेतकरी व्यस्त होते. यामुळे पिके हिरवीगार व बहार झालेली दिसत होती.पण सोमवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी पावसाने झोडपले आणि एका रात्रीत हजारो हेक्टर शेताशेतामध्ये पाणी साचले आणि संपूर्ण पिके पाण्याखाली गेली.बागायती कापूस, जिरायत कापूस, मूग, उडीद, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे,दुबार पेरणी, मशागती, खते, फवारणी, मजुरीसाठी मोठा खर्च केला असून आलेल्या या अस्मानी संकटाला तोंड कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.
सावखेडा शिवाराकडून पातोंडयाकडे सुटवा नाला वाहतो. गेल्या दोन तीन वर्षांपासून सुटवा नाला कोरडेठाक असायचा पण एका रात्रीत सुटवा नाला ओसंडून वाहू लागल्याने सुटवा नाला परिसरातील दूरदूर पर्यंत शेती पाण्याखाली गेली असून पिके तरंगताना दिसून येत आहे.बहुतेक शेतकऱ्यांचे बागायती कापूस असून शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

Previous Post

धक्कादायक! पत्नीचा गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीन विहरीत उडी घेऊन केली आत्महत्या

Next Post

भीषण अपघात! धरणगावजवळ दोन तरुण जागीच ठार !

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

भीषण अपघात! धरणगावजवळ दोन तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!