पोलीस वृत्त -चंद्रपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीन विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील देवाडा इथं घडली आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे.
स्नेहा डहूले, सूधाकर डहूले असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार ,पोलीस स्टेशन पडोली अंतर्गत येणाऱ्या देवाडा येथील महाकाली नगरी भागातील रहिवासी असलेले सुधाकर डहुले ( वय 40 ) हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होते. सोमवारी कौटुंबिक वादातून त्याने पत्नी स्नेहा डहुले हीची राहत्या घरी गळा आवळून हत्या केली. (Due to a family dispute, he strangulated his wife Sneha Dahule at their residence)
त्यानंतर सुधाकर याने घराजवळील गजानन महाराज मंदिर मैदानात असलेल्या विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
विहीरीत पाणी खूप खोल असल्याने चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापन टीम मृतदेह विहरीतून काढण्याची कार्यवाही करीत आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.(Padoli police is conducting further investigation.)