जळगाव पोलीस वृत्त – आज दुपारी चोपडा रोडवरील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. धक्कादायक प्रकार घडला आहे याबाबत संपूर्ण परिसरात हडपड व्यक्त होत आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील संजय नगर भागातील रहिवाशी असलेले प्रदीप पाटील (वय२४) आणि किशोर पाटील (वय ३२) हे दोघं आज कामानिमित्त चोपडा येथे गेलेले होते. दुपारी चोपड्याहून परत येतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांची दुचाकी (क्र. एमएच.१९ सीएच ३८९४) झाडाला धडकली. अपघात इतका भीषण होता की, एकाची कवटीच फुटली तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते.

