अमळनेर : पोलीस वृत्त न्युज – वातावरणातील प्रदूषकांमुळे हवेची गुणवत्ता कमी होते. वातावरणात प्रदूषक जेवढे जास्त तेवढा गुणवत्ता निर्देशांक जास्त असतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण चांगले नाही.
सध्या वातावरणात खूप विषमता निर्माण झालेली आहे. त्यातच पारा खूप घसरला आहे. त्यामुळे प्रचंड थंडी जाणवत आहे. दहा अंश सेल्सिअसच्या जवळ तापमान असल्यामुळे अनेक प्रकारचे आजार डोके वर काढायला लागले आहेत. कमी रोगप्रतिकारक्षमता असलेले यामुळे त्रासलेले आहेत. सर्दी, पडसे, घसा खराबी, खोकला, श्वसनाचे विकार, ताप व अन्य आजारांनी उच्चांक गाठलेला आहे.
त्यातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक कमालीचा वाढलेला आहे, असे मत साने गुरुजी विद्यालयाचे पर्यावरण प्रेमी शिक्षक डी ए धनगर यांनी नोंदवले आहे. त्यामुळे हवेची दृश्य मानता कमी झालेली आहे. दिल्ली सारख्या मोठ्या शहरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकेदायक पातळीच्या वर आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक आपल्या जिल्ह्यात वाढतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात पर्यावरण पूर्वक दिवाळी साजरी केल्यामुळे गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात राहिला परंतु सध्या ऋतू बदल कालखंडात हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारून आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. सध्या चिंताजनक पातळीवर असलेला हवेचा निर्देशांक अति चिंताजनक पातळीवर जाणार नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हवेचे प्रदूषण होणार नाही यासाठी मदत केली पाहिजे. सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.अन्यथा अनेक प्रकारचे आजार वाढण्यास मदत होईल असे मत डी ए धनगर यांनी नोंदवले. तसेच अनेक प्रकारचे शासनाचे आजार वाढवून काही रुग्ण दगावण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात ठेवला पाहिजे.
सध्या प्रचंड थंडी पडत असल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांनी तसेच कमी प्रतिकारक्षमता असलेल्या नागरिकांनी विनाकारण सकाळी लवकर घराच्या बाहेर पडू नये. व उबदार कपडे वापरावेत असे आवाहन देखील श्री धनगर यांनी केले आहे.