परभणी: पोलीस वृत्त न्युज– गंगाखेड तालुक्यातील धारासुर शिवारातील ही घटना. गुरुवारी दुपारच्या तीन वाजता अचानक एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेखाली जीव दिला. मालगाडी आली आणि त्यांच्या अंगावरून गेली आणि सगळीकडे खळबळ उडाली
लोकांना लवकर लक्षात आलं नाही, पण जेव्हा हे शिक्षकाचे कुटुंब होतं, हे समजलं तेव्हा सारेच सुन्न झाले.
या घटनेत मसनाजी सुभाषराव तुडमे हे 47 वर्षीय शिक्षक, त्यांची पत्नी 42 वर्षीय रंजना मसनाजी तुडमे व वीस वर्षीय मुलगी अंजली मसनाजी तुडमे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली तुडमे हे गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते ते अहमदपूर तालुक्यातील किन्नीकुद्दू येथील रहिवासी होते.
गुरुवारी दुपारी अचानक ही घटना घडल्यानंतर त्यांची धड आणि शीर वेगवेगळे झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सहाय्यक निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, फौजदार असिफ शेख व त्यांच्या पथकाने या ठिकाणी भेट दिली व गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात हे मृतदेह शिवविच्छेदनासाठी दिले. ही आत्महत्या कशामुळे झाली हे मात्र आद्याप समजू शकले नाही.