अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं आणि उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. यातच तालुक्यात अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला नसून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून वेगवेगळ्या उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. पण यात निश्चित खरा उमेदवार कोण असणार अद्यापही याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार तसेच काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक सुभाष पाटील हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पण यांना पक्ष उमेदवारी देणार का? हा देखील प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. आणि पक्षाने उमेदवारी दिली तर सुभाष पाटील निवडणूक लढणार का याबाबत देखील जनता विचारात आहे. तर थेट पोलीस वृत्त न्यूजने प्राध्यापक सुभाष पाटील यांच्याशी संवाद साधला असून की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवारी करणार आहात का? जर तुम्हाला पक्षाने तिकीट दिले नाही तर तुम्हीही निवडणूक अपक्ष लढणार का असा थेट सवाल प्राध्यापक सुभाष पाटील यांना केला आहे. तर प्राध्यापक सुभाष पाटील यांनी बोलताना सांगितले की मला जर पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरच उमेदवारी करेल जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर मी उमेदवारी करणार नाही अपक्ष उमेदवारी करणार नाही. पक्षाचा सर्वे झाला असून सर्वे मध्ये सगळ्यात जास्ती पसंती मला मिळालेली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा फार मोठा वर्ग माझ्यासोबत आहे. निवडणुकीसाठी मी लढावं यासाठी आर्थिक मदत देखील करायला तयार आहेत. उमेदवारीचा आग्रह देखील करत आहेत. माझी पक्षाच्या धोरणांची, विचारांशी माझी बांधिलकी आहे. महाविकास आघाडीशी निवडणूक लढण्यासाठी चुकीचा उमेदवार दिला तर पक्षाकडे तक्रार करेल उमेदवार बदलवायचा आग्रह धरेल.