अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन: आजही तालुक्यात जनतेचा मनामध्ये संभ्रम निर्माण झाल्याची दिसत आहे. की माजी आमदार शिरीष चौधरी निवडणूक लढवणार का? व ती कशा प्रकारे नेमके कोणत्या पक्षाचे तिकीट घेणार आहे का? का अपक्ष लढणार याबाबत आज थेट शिरीष चौधरी यांच्याशी पोलीस वृत्त न्यूज ने सवाल केला आहे. याबाबत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पोलीस वृत्त न्युज शी बोलताना सांगितले की निश्चितच २०१४ मध्ये मी जसा निवडून आलो २०१९ मध्ये अल्पशा मताने पराभूत झालो तेव्हापासून जे काम सुरू केला आहे. ते आता २०२४ मध्ये निश्चित उमेदवारी करतो आहे. माझ्या पाच वर्षापासून सगळ्यांना भेटीगाठी सुरु आहेत जनतेच्या समस्या कोरोना काळामध्ये केलेली मदत त्यामध्ये विकाससाठी नेहमी आणलेला निधी मी माजी आमदार असून सुद्धा आणलेला निधी. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग झालो भेटीगाठी घेतल्या तेव्हापासून माझा प्रयत्न सुरू होता आणि २०२४ मध्ये निश्चितच माझी उमेदवारी दाखल करणारा आहे. तर २०२४ जे इलेक्शन आहे. ते मी अपक्ष लढणार आहे. कुठलाही पक्ष मी घेणार नसुन अपक्ष उमेदवारी आहे. आणि अपक्ष उमेदवार म्हणूनच २०२४ मध्ये रिंगणात उतरणार आहे.
जनतेची इच्छा अपक्ष उमेदवारी
रात्रंदिवस माझ्यासाठी काम करणारे माझ्यासोबत फिरणारे ग्रामस्थांची इच्छा आहे. जनताजनार्जाची इच्छा आहे मी अपक्ष लढल पाहिजे म्हणून मी अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरणार बाकीच्या पक्षांची देखील मला मोठ्या प्रमाणात ऑफर आहे. पण जनता जनार्दन जे मला निवडून देणार आहे. त्यांचेच इच्छा असल्याकारणाने मी अपक्ष निवडणूक लढणार
पराभूत असूनही आजही लोक आमदार म्हणूनच पाहतात
पराभूत झाल्यानंतर देखील लोकांच्या मनात आमदार म्हणूनच आहे. कुठल्याही कामासाठी जरी मला कार्यकर्तेचा जनतेचा फोन आला असेल तरी मी ते काम तत्परतेने केले आहे. शेतकऱ्यांना मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या दुष्काळी पैसा देखील मी काढून दिलेला आहे. माजी आमदार असून देखील निधी मोठ्या प्रमाणात आणून दिला आहे. ग्रामीण भागात गावागावात तसेच शहरांमध्ये देखील काम केले आहेत. या हिशोबाने लोकांच्या मनावर आजही आमदार आहे. आणि माझ्या पद्धतीने तोच दृष्टिकोन आहे आयुष्यात कधी कोणासमोर कोणापुढे भेदभाव केला नाही. तर आजही घराला दरवाजा नाही. कोणी सर्वसाधारण व्यक्ती येतं मला भेटतं आणि त्यांच्या अडचणी माझ्यापुढे मांडू शकतो तर ते सोडवण्यासाठी देखील मी तत्पर आहे. हा विश्वास लोकांचा आहे. शिरीष दादांनी दिलेला शब्द हा शंभर टक्के पाडतात. हा अनुभव त्यांना असल्याकारणाने त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे याच्या जनतेचा जो जनतेचा जो कल आहे. तो मोठ्या प्रमाणात आहे आजही जनतेला वाटते की शहराचा विकास ग्रामीण भागाचा विकास मतदारसंघाचा विकास शिरीष चौधरीच करू शकणार हा जनतेचा विश्वास घेऊनच इतरस्त पक्ष माझ्याकडे आले होते. मी त्यांना हात जोडून विनंती केली. माझी जनता जे सांगेल तेथे मी बसणार ज्याची सत्ता बसेल तिथे आम्ही बसणार आहोत आणि सत्तेमध्येच परिसराचा विकास करता येईल म्हणूनच मी अपक्ष उमेदवारी दाखल करत आहे. मा. आ शिरीष चौधरी, अमळनेर